Sunday, April 1, 2012

प्रारंभ लेखनाचा......



दिसामाजी काहीतरी ते लिहावे
         प्रसंगी अखंडित वाचीत जावे ..........

असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात.......

वाचन तर नेहमी चालूच असते पण खास लिखाण असे कधी घडले नव्हते, म्हणजे चार ओळी कागदावर कधी खरडल्याही असतील पण ते तेवढे तेवढ्यापुरतेच, खास असे बसून कोणत्यातरी खास कारणास्तव लिहावे असे कधी घडले नव्हते. 


पण गेल्या दोन दिवसांत अचानक काही blogs वाचनात आले त्यातील एका blog ने तर फारच प्रभाव पाडला... आणि मग वाटले अरे असे काहीतरी हलकेफुलके ,सोपे,सहज, साधेसरळ आपणही काही लिहू शकतो. त्यामुळे मग राहून राहून वाटायला लागलं की आपणही कुठेतरी सुरुवात करावी..... 


आज लिखाण सुरु करावे अशी अगदी अंतःप्रेरणा झाल्यासारखेच झाले आणि योगायोग तरी काय म्हणावा आज नेमकी रामनवमी अगदी चांगला दिवस, कवितांच्या बाबतीतही तसेच काहीसे घडले आणि त्या दिवशी नेमकी विजयादशमी होती, असो ......  मग काय आज म्हटले एकदाचे होऊनच जाऊंदे....... लिखाण चांगले असूंदे अथवा वाईट...... तंत्रज्ञान उपलब्ध आहे ना आपले मतप्रदर्शन करण्यास , मग फायदा घ्यावा...... 


लिखाण उत्तम दर्जाचे,वाचनीय, मनोवेधक असेलच असे नाही पण तरीही "नदी चांगले पाणी घेऊन वाहत असली म्हणून काय नाले वाहायचे थांबतात , अशीही मग एक वेळ येते की हे नदीचे पाणी आणि हे नाल्याचे पाणी असे भिन्न दाखवता येत नाही. " .. ... लिखाणाचेही तसेच आहे इतर सारे चांगले लिहितात म्हणून आपण काय लिहिणे टाकायचे..... आणि मग अशीही एक वेळ येईल की शुल्लक लिहिता लिहिता दर्जेदार लिहिता येऊ लागेल......... म्हणून आज ही छोटीशी सुरुवात..... आता पुढे बघूया... भले शब्दांचे महाल उभारता नाही येणार पण तरी एखादी चंद्रमौळी वास्तू नक्कीच उभारू...............


genius_pankaj

No comments:

Post a Comment